Tur price today या जिल्ह्यात तुरीला 12 हजार 700 रुपये भाव मिळाला, पहा एका क्लिकवर.tur

Tur price today या जिल्ह्यात तुरीला 12 हजार 700 रुपये भाव मिळाला, पहा एका क्लिकवर.tur

महाराष्ट्रात सर्वात जास्त कापूस व मक्का या पिकाचे लागवड केली जाते आणि अशा वेळेस शेतकऱ्याकडे दुसरे पीक घेता येत नसल्याने अनेक भागांमध्ये यंदा तूर या पिकाला चांगला दर मिळत आहे अनेक शेतकऱ्यांनी तुरीची लागवड कमी केली असून कापूस मका या पिकाकडे जास्त लक्ष दिलेले आहे मंडळी तुरीच्या भावाला सर्वात जास्त विक्रमी दर मिळालेला आहे तो म्हणजे आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्या बाजारात आज किती दर मिळाला खालील प्रमाणे पहा.

कापसाची अग्रिम देण्यास विमा कंपनीचा नकार

Tur price today अकोला या कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीच्या दरात वाढीचा कल निर्माण झालेला आहे. तुरीला क्विंटलला कमाल दर १२ हजार ७१५ रुपये मिळाला आहे. तर किमान दरही ९००५ रुपये होता. बाजारात सुरू झालेल्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेली तूर विक्रीला काढणे सुरू केले आहे .

मागील महिनाभरापासून तुरीच्या दरात वाढ होऊ लागली आहे. या आठवड्यातही हाच कल कायम होता. शुक्रवारी (ता.२२) येथील बाजार समितीत सुमारे ४७८ क्विंटलची आवक झाली. गुरुवारी (ता. २१) तूर किमान ९ हजार ४०० व कमाल १२ हजार २५० रुपयांनी विक्री झाली. बुधवारी (ता. २०) तुरीचा दर ८ हजार ५०० ते १२ हजार ३०५ रुपये असा होता. सरासरी ९ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला.

New Crop status

Tur price today मंगळवारी (ता. १९) तुरीचा सरासरी द १० हजार ५०० रुपये होता. किमान दर हजार ४०५ व कमाल १२ हजार ५०० रुप होता. या आठवड्यात तुरीची आवक वाढ असल्याचेही समोर आले

यंदा पिकाचे मोठे नुकसान उत्पादन घट होणार

गेल्या हंगामातील साठवलेली तूर सध्या विक्रीसाठी येत आहे. नवीन हंगामाला अद्याप बराच उशीर असून, यंदाचे पीकही नुकसानीच्या तडाख्यात सापडलेले आहे. प्रामुख्याने लागवडीनंतर १५ ते २० दिवसांनी तुरीच्या पिकाला बुरशीचा फटका बसला. बुरशीजन्य रोगांमुळे तुरीचे बऱ्याच क्षेत्रावरील पीक उद्ध्वस्त झालेले आहे. त्यामुळे यंदा तुरीच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे.

आवक कमी असल्याने मागणी जास्त वाढली

गेल्या हंगामातील तूरही बहुतांश विक्री झालेली आहे. आता थोडाफार शिल्लक असलेला साठा विक्रीसाठी निघत आहे. मागणीच्या तुलनेत तुरीची कमतरता असल्याने बाजारात दर वाढीचा कल सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. नवीन माल बाजारात येईपर्यंत तुरीच्या दरात चढ-उताराचे चक्र कायम राहू शकते, असेही या क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत.

Leave a Comment