Tur Market Bhav : तुरीचे दर दोन दिवसांत 500 रुपयांनी घटले… जाणून द्या आजचे नवीन दर

Tur Market Bhav : तुरीचे दर दोन दिवसांत 500 रुपयांनी घटले… जाणून द्या आजचे नवीन दर

तुरीचे दर दहा हजार पाचशे दहा फेब्रुवारीपासून तुरीच्या दरातही घसरण सुरू झाली आहे. दोन दिवसांत तब्बल प्रतिक्विंटल दर पाचशे रुपयांनी कमी झाले आहेत. तुरीचे वाढीवर असलेल्या दरात घसरण सुरू झाल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. गेल्या वर्षीं सततच्या पावसामुळे कापूस,

📢हे पण वाचा- Namo Shetkari Yojana Beneficiary या शेतकऱ्यांनाच नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळेल.

सोयाबीन या प्रमुख पिकांच्या उत्पादनात निम्म्याने घट आली आहे. यंदा कापसाचे दर सात हजार दोनशे रुपयांच्या पुढे सरकलेच नाही. कापसाचे दर वाढतील, असा तज्ज्ञांचा अंदाज होता. त्यामुळेच शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबविली होती.

📢हे पण वाचा- March kapus rate : कापूस भाव पुढच्या १५ दिवसांमध्ये कसा राहू शकतो? तज्ज्ञांचा नवीन अंदाज

दर वाढण्याऐवजी घसरल्याने ऐन हंगामात बाजारात विक्रीला येणाऱ्या कापसाची आवक मंदावली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कापसाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. तशीच स्थिती सोयाबीनची आहे. सोयाबीनचे दरही हमीभावाच्या खाली गेले आहे. त्यामुळे

शेतकऱ्यांची सर्व आशा तुरीवरच होती. तुरीचे दर सातत्याने वाढतीवर असल्याने तूर बारा हजार रुपयांचे दर गाठतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. गेल्या आठवड्यात तुरीचे दर दहा हजार पाचशे रुपयांवर पोहोचले होते. त्यामुळे शेतकरी आनंदात होता.Tur Market Bhav

📢हे पण वाचा- Beneficiary Status 2024 : 16 वा हप्त्याचे 4000 रुपये जाहीर, लाभार्थीचे नाव तपासा

मात्र, १० फेब्रुवारीपासून दुरीच्या दरातही घसरण सुरु झाली आहे. दोन दिवसांत प्रती क्विंटल पाचशे रुपये कमी झाले आहे. दर कोसळल्याने शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन विकण्याऐवजी घरात साठवणूक केला आहे.

आता तुरीच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांसमोर विक्री करावी की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. Tur Market Bhav

📢हे पण वाचा- Nuksan bharpai list : नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३७ कोटी मिळणार मंडळानुसार यादी पहा…

सद्यःस्थितीत तुरीला नऊ हजार ७०५ रुपये दर मिळत आहे. यात वाढ व्हावी, अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. दोन दिवस बाजार सुटी आहे. त्यामुळे मंगळवारी (ता. २०) बाजार समिती उघडल्यानंतर दर वाढतील की कमी होतील, हे स्पष्ट होणार आहे.Tur Market Bhav

📢हे पण वाचा- Namo shetkari yojana installment : नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची दुसऱ्या हप्ताची तारीख झाली जाहीर

Leave a Comment