Today Rain News : विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा

Today Rain News : विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा

पावसाने ओढ दिली असून राज्यात उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत. मात्र, आता राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २) संपूर्ण विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा आहे. तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे कायम आहे. ईशान्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत ३.१ मीटर उंचीवर, दक्षिण छत्तीसगडमध्ये समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत. तर अंतर्गत कर्नाटक ते कोमोरिन भागापर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. उत्तर बंगालच्या उपसागरात उद्या (ता. ३) चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होणार असून, त्याचा प्रभावामुळे मंगळवारपर्यंत हवेचा कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

विजांसह पावसाचा इशारा

  • सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

राज्यात पावसाने उघडिप दिली असून, कमाल तापमानात वाढ झाली आहे. राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे. आज (ता. २) विदर्भातील सर्व जिल्हे, मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांत विजांसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे. आज (ता. २) विदर्भातील सर्व जिल्हे, मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांत विजांसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

आजून माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment