Pm kisan yojna 2024 – पीएम किसानचे पैसे खात्यात जमा झाले नाही, हे काम करा लगेच पैसे खात्यात जमा

Pm kisan yojna 2024 – पीएम किसानचे पैसे खात्यात जमा झाले नाही, हे काम करा लगेच पैसे खात्यात जमा बँकेत पैसे आहेत; पण काढता येत नाहीत खाते होल्ड : हजारो शेतकऱ्यांचे पीएम किसानचे पैसे अडकले

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

Pm kisan yojna 2024 : जिल्ह्यातील कोणत्याही बँकेने शेतकऱ्यांना पीएम किसान, संजय गांधी निराधार योजना किंवा अन्य योजनांचे अनुदान मिळणारे बँक खाते होल्ड करू नयेत, अशा सूचना दिल्या आहेत. प्रशासनाच्या आदेशानंतरही एसबीआय, बीओआय, महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्यासह अनेक बँकांनी हजारो शेतकऱ्यांची बँक खाती होल्ड केली. त्यामुळे शेतकरीवर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

📢हे पण वाचा- राज्यातील कापूस दरात मोठी सुधारणा होणार ! आताची सर्वात मोठी बातमी आली समोर Cotton Big Update

कुठल्याही बँकेने शेतकऱ्यांना मिळालेले अनुदानाचे पैसे कपात करू नये, अशा सक्त सूचना राज्य शासनाने बँकांना काही दिवसांपूर्वीच दिल्या आहेत. मात्र, असे असताना अनेक बँकांनी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत थकीत कर्जदार शेतकऱ्यांची बँक खाती होल्ड केली.

Pm kisan yojna 2024 हे काम करा लगेच पैसे खात्यात जमा

आहेत. बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यात किसान सन्मान योजना व मुख्यमंत्री सन्मान योजनेचे अनुदान तसेच अतिवृष्टी व पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत. हे पैसे शेतकऱ्यांना उचलता येऊ नये, यासाठी बँकांनी कर्जाचे खातेच होल्ड केले आहे. त्यामुळे पैसे असूनही शेतकऱ्यांना उचलता येत नाहीत.Pm kisan yojna 2024

📢हे पण वाचा- Nuksan bharpai status : नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 36 हजार रुपये वाटप झाली सुरू, हे शेतकरी असणार पात्र

Pm kisan yojna 2024 बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नसल्यास अशी खाती बँकांकडून होल्ड केली जातात. मात्र, ज्या खात्यावर पीएम किसानसह अन्य शासनाच्या योजनांचे अनुदान जमा होत आहे, असे खाते बँकांनी होल्ड करू नये.- महेश वडदकर, निवासी उपजिल्हाधिकारी

बँकांनी शेतकऱ्यांचे होल्ड केलेले खाते तत्काळ काढावे, यासाठी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे, अन्यथा नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन बँकांच्या विरोधात आंदोलन केले जाईल. – गजानन चव्हाण, शेतकरी

जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करीत नाहीत किंवा त्यांच्याकडे दीर्घ व मध्यम मुदतीचे थकीत कर्ज आहे, अशा शेतकऱ्यांचे खाते बँकांकडून होल्ड केले जाते.अनिल गचके, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक, नांदेड

📢हे पण वाचा- Crop Insurance latest update-८ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविमा जमा होणार ; सरकारचा आदेश वाचा सविस्तर

Leave a Comment