Pm kisan 2024 : शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी…! पीएम किसान’ चा १६ व्या हप्ता उद्या खात्यात जमा होणार, येथे पहा यादीत नाव

Pm kisan 2024 : शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी…! पीएम किसान’ चा १६ व्या हप्ता उद्या खात्यात जमा होणार, येथे पहा यादीत नाव

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील ८७ लाखांवर शेतकऱ्यांना लाभ,केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ ८७ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना मिळणार असून या पोटी १९४३ कोटी ४६ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधीचे चार हजार रुपयांप्रमाणे ३७९२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होणार आहेत. Pm kisan 2024

📢हे पण वाचा- Pm kisan and namo shetkari : पीएम किसानचा १६ वा आणि नमो किसानचे दोन हप्ते होणार जमा,यादीत नाव पहा

यवतमाळ जिल्ह्यातील भरी येथे बुधवारी (दि. 28) एका विशेष समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्याचे वाटप होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी तीन हप्ते दिले जाणार असून, त्यासाठी आवश्यक ती व्यवस्था थेट पंतप्रधान कार्यालयातून करण्यात आली आहे. केंद्रीय कृषी विभाग आणि राज्य सरकारने संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यामुळे राज्यातील 87 लाख 96 हजार शेतकऱ्यांना DBT द्वारे लाभ मिळणार आहे. पंधराव्या हप्त्याच्या तुलनेत २ लाख ३३ हजार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला असून, या शेतकऱ्यांनी यशस्वीरित्या ई-केवायसी पूर्ण केले आहे.

📢हे पण वाचा- Pm kisan Beneficiary Status : पीएम किसानचा 16 वा हप्ता,या शेतकऱ्यांना भेटणार नाही,पहा यादीत तुमचे नाव.

देवेंद्र फडणवीस यांनी मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात नमो शेतकरी महासन्मान निधीची घोषणा केली होती आणि त्यानुसार पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्यात नमो शेतकरी फेडरेशन फंडातून ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

एक लाभ प्रदान करण्यात आला, आणि यासाठी 1712 कोटींची तरतूद करण्यात आली. सध्या, राज्य सरकारने दुसऱ्या हप्त्यासाठी 1792 कोटी आणि तिसऱ्या हप्त्यासाठी 2000 कोटींचे वाटप अधिकृत केले आहे. त्यामुळे हे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. Pm kisan 2024

गावोगावी साजरा होणार किसान उत्सव दिवस Pm kisan 2024

२८ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यानुसार कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी कृषी विभागाच्या जिल्हा, तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांना हा दिवस पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून गाव पातळीवर तसेच कृषी विज्ञान केंद्र सामाईक सुविधा केंद्र येथेही पीएम किसान उत्सव दिवस साजरा केला जाणार आहे.

📢हे पण वाचा- Pradhan Mantri Kisan Samman Nidhi scheme : पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता 28 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार..!

Leave a Comment