PM Kisan : ३० हजार शेतकऱ्यांकडून होणार वसुली, किसान पेन्शन ‘नाहक’ घेतली; लाभाची रक्कम कधी भरणार?

PM Kisan : ३० हजार शेतकऱ्यांकडून होणार वसुली, किसान पेन्शन ‘नाहक’ घेतली; लाभाची रक्कम कधी भरणार?

शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना २०१८ पासून सुरू करण्यात आली आहे. मात्र, या योजनेचा लाभ आयकर दाते तसेच निकषात न बसणाऱ्या व्यक्तींनी घेतल्याचे निदर्शनास आल्याने घेतलेला लाभ परत करण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. त्यासाठी लाभार्थ्यांच्या दस्तऐवजांची पडताळणी सुरू असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

हे पण वाचा- mini tractor yojna 2024 : मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज सुरु ९० टक्के मिळणार अनुदान 

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये पेन्शन तीन टप्प्यांत दिली जात आहे.PM Kisan

जिल्ह्यात या योजनेचे ५ लाख ९४ हजार ६२५ एवढे लाभार्थी आहेत. मात्र, या योजनेचा लाभ केवळ अल्पभूधारक तसेच ज्यांचे उत्पन्न १० हजारांच्या आत आहे, अशांना देण्यात येतो. मात्र, आयकर भरणाऱ्यांनीही हा लाभ घेतला असल्याचे निदर्शनास आले आहे.PM Kisan

३० हजार शेतकऱ्यांकडून होणार वसुली

या योजनेचा लाभ आयकर भरणारे तसेच नवरा-बायको दोघेही नोकरीला असणाऱ्यांकडून घेण्यात आला होता. आधार कार्ड लिंक असल्याने शासनाच्या ही बाब निदर्शनास आली. त्यामुळे अशा अपात्र शेतकऱ्यांवर कारवाई करून त्यांना देण्यात आलेली रक्कम परत करण्यासंदर्भातील आदेश केंद्र सरकारने दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील ३० हजार लाभार्थ्यांकडून वसुलीची प्रक्रिया सुरू आहे.

एकाही शेतकऱ्याकडून वसुली नाही

अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे परत घेण्यासंदर्भात प्रत्येक तालुक्यात कारवाई सुरू झाली आहे. पोर्टलद्वारे पैसे भरण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. मार्च अखेरीस ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. त्यानंतरच आकडा सांगता येईल. सध्यातरी एकाही शेतकऱ्याकडून वसुली झाली नसल्याचे सांगण्यात आले.PM Kisan

कोणत्या तालुक्यात किती लाभार्थी ?

तालुकालाभार्थी
अमळनेर४६७४९
भडगाव२७०८२
बोदवड१५३३०
भुसावळ२१२८४
चाळीसगाव५६८४४
चोपडा३४१२०
धरणगाव२४५२७
एरंडोल२६६०४
जळगाव३७६९१
मुक्ताईनगर22223
पाचोरा३६८६४
पारोळा३७६५६
रावेर९५३९१
यावल५४५७५

हे पण वाचा- Insurance company : या 7 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा दिला जाणार नाही.

Leave a Comment