शेतकऱ्यांना सरसकट ‘अग्रिम’ पिक विमा मिळणार नाही ? pik vima update

सरसकट ‘अग्रिम’ ला विमा कंपन्यांचा नकार,मुख्यमंत्र्यांची विनंती धुडकावली pik vima update

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

pik vima update राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा योजनेतून नुकसान भरपाई देताना कंपन्यांनी संवेदनशीलपणे आणि सकारात्मक भावनेने सरसकट अग्रिम देऊन मदत करावी, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमा कंपन्यांना बैठकीत केली.

पत्नीच्या नावावर बँकेत खाते उघडा आणि महिना 45,000 हजार रुपये मिळणार

pik vima update मात्र कंपन्यांनी त्यास नकार देत पीकविम्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जेथे वस्तुस्थितिजनक पंचनामे झाले आहेत, तेथेच अग्रिम देण्यात येईल, असे सांगितले

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बुधवारी (ता. ४) पीकविम्यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

crop insurance

या वेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव मनोज सौनिक, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्यासह विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

pik vima update मुख्यमंत्री शिंदे यांनी यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे पावसाअभावी मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी अडचणीत आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. त्यामुळे राज्यातील जेवढ्या शेतकऱ्यांच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत, त्यांना अग्रिम द्या.

पीक कापणी प्रयोगानंतर अपेक्षित उत्पादन घट नसेल तर राज्य सरकारला पीकविमा कंपन्या ‘बीड पॅटर्न’ नुसार जी रक्कम देणे असेल त्यातून रक्कम घेऊन शकतात, अशी सूचना केली. मात्र कंपन्यांनी या प्रस्तावास नकार दिला. पीकविम्याच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये जे नियम आहेत, त्या प्रमाणेच अग्रिम रक्कम देऊ, असे कंपन्यांनी सांगितले.

‘प्रस्तावांवरील आक्षेप वस्तुनिष्ठपणे तपासा’

“बळीराजाला दिलासा म्हणून राज्य शासनाने एक रुपयामध्ये पीक योजना सुरू केली आहे. अशी विमा योजना सुरू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असल्याचे सांगत विम्यापोटी शेतकऱ्यांनी भरायचा हिस्सा राज्य शासन अदा करत आहे. या मागची शासनाची भूमिका विमा कंपन्यांनी समजून घेतली पाहिजे. विमा कंपन्यांनी प्रस्तावांवर जे आक्षेप घेतले आहेत, ते जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ पद्धतीने तपासून घ्यावेत,’ असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी दिले.

Leave a Comment