Pik vima company : शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम द्या ? विमा कंपनीला आदेश

Pik vima company : शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम द्या ? विमा कंपनीला आदेश

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

Pik vima company महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत की महाराष्ट्र ते सर्व शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा संरक्षण या योजनेचा लाभ घेतलेला आहे सर्व शेतकऱ्यांनी एक रुपयांमध्ये पिक विमा योजना काढलेला असून आता शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम कधी मिळणार आहे याची माहिती आपण सविस्तर बघूया.

Pik vima company फुलंब्री तालुक्यातील पिरबावडा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना २५ टक्के रक्कम तत्काळ वितरित करा असे आदेश तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांनी विमा कंपनीला दिले आहे.

crop insurance

फुलंब्री येथील तहसील कार्यालयात सोमवारी (ता. २५) तहसिलदारांनी पीक विमा योजनेचा आढावा घेतला. यावेळी तालुका कृषी अधिकारी भारत कासार, चोलामंडलम पीक विमा कंपनीचे जिल्हा विमा प्रतिनिधी ईश्वर भिंगारे, तालुका विमा प्रतिनिधी बी. डी. अंभोरे, विशाल सोनवणे यांच्यासह पिरबावडा व इतर महसुल मंडळातील शेतकरी उपस्थित होते.

या बैठकित पिरबावडा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीची २५% अगाऊ रक्क्कम का..० मिळाली नाही असा प्रश्न शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला.

तसेच पीक नुकसानीची पूर्वसूचना दिल्यानंतर कंपनी प्रतिनिधी यांनी तत्काळ पंचनामा करावा अशी मागणी केली. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून तहसीलदार कानगुले यांनी पीक विमा कंपनीला तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले. सदर आढावा सभेला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Leave a Comment