हवामान अंदाज,पावसाचा जोर पुन्हा वाढणार,या जिल्यातील अंदाज जाहीर

हवामान अंदाज,पावसाचा जोर पुन्हा वाढणार,या जिल्यातील अंदाज जाहीर

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

हवामान अंदाज : मान्सूनच्या पावसाचा जोर वाढल्याने राज्याच्या अनेक भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडला. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे नद्यांना पूर आला होता. आज (ता. 10) कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटांवर अतिवृष्टीचा ‘यलो अलर्ट’ आहे. राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

👉👉संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.👈👈

मान्सूनच्या नेहमीच्या स्थितीच्या दक्षिणेला सक्रिय कमी दाबाचे क्षेत्र आहे. हे क्षेत्र जैसलमेर, अजमेर, गुना, मंडला, पेंद्र रोड आणि दिघा पासून ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेले आहे. मध्य प्रदेश आणि जवळपासच्या प्रदेशांमध्ये समुद्रसपाटीपासून ७.६ किमी उंचीवर चक्रीवादळ वारे वाहत आहेत. या कमी दाबाच्या पध्दतीचा विस्तार दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत झाला आहे. अंदमान समुद्रातही चक्रीवादळ वारे वाहत असून, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात मंगळवारपर्यंत (ता. 12) नवीन चक्रीवादळ परिस्थिती निर्माण झाली आहे.

कारण पावसाला पोषक वातावरण असल्याने राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली. अनेक भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. आज (ता. 10) कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांत अतिवृष्टीचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. याशिवाय, राज्याच्या उर्वरित भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा.

महाराष्ट्रातील सर्व बातम्या जाणून घेण्यासाठी किंवा इतर आधारभूत माहिती करण्यासाठी आपल्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर सामील व्हा.

Leave a Comment