Nuksan Bharpai List 2023 : मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार रक्कम,९.६७ लाख शेतकऱ्यांना भरपाई; ७०९ कोटी रुपयांचा निधी मंजूर

Nuksan Bharpai List 2023 : मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार रक्कम,९.६७ लाख शेतकऱ्यांना भरपाई; ७०९ कोटी रुपयांचा निधी मंजूर

मराठवाड्यात नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे झाले होते. या नुकसानीपोटी शासनाने शैतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली असून मराठवाड्यातील ९.६७ लाख शेतकऱ्यांना ७०९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. Nuksan Bharpai List 2023

हे पण वाचा- Beneficiary List of PM Kisan : तुमच्या बँक खात्यात 2000 आले का, तात्काळ यादीत नाव पहा

Nuksan Bharpai List 2023 यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे. मराठवाड्यात नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे हरभरा, गहू, मका, रब्बी ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना हरभरा पिकाची दुबार पेरणी करावी लागली होती, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी करडईचे पीक घेतले आहे. खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामातही पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. दरम्यान, शासनाने या पिकांचे पंचनामे करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मराठवाड्यात पंचनामे करण्यात आले होते.

यामध्ये आठही जिल्ह्यांमधून ९.६७ लाख शेतकऱ्यांचे ४.९४ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले होते. या नुकसानीच्या भरपाईसाठी ७०९.९२ कोटींचा निधी आवश्यक असल्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार शासनाने भरपाईसाठी ७०९.९२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शासनाकडून काही प्रमाणात का होईना मदत मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

आठ जिल्ह्यांत ४.९४ हजार हेक्टर शेतीचे नुकसान

शेतकऱ्यांच्या याद्या अपलोडच्या सूचना

मराठवाड्यात नुकसान भरपाईसाठी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांच्या याद्या क्षेत्रनिहाय व बँक खाते क्रमांकासह अपलोड करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या याद्या अपलोड झाल्यानंतर केंद्रीय पद्दतीने महा आयटी वरून संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा केले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या प्राप्त झालेल्या यादीनुसार सदर रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

मराठवाड्यात पीक विमा देण्याचा प्रश्न मात्र सुटेना

मराठवाड्यात पिक विमा देण्याचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही. शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम रक्कम देण्याच्या प्रशासनाच्या आदेशाला विमा कंपनीने केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पिक विम्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याचे चित्र आहे. Nuksan Bharpai List 2023

Nuksan Bharpai List 2023 हिंगोली जिल्ह्यात विमा कंपनीने पिक विमा देण्याच्या आदेशाला थेट केंद्रीय समितीकडे अपील दाखल केले होते. या अपिलावर केंद्रीय समितीने विमा कंपनीचे अपील मान्य केले आहे. त्यामुळे आता इतर ठिकाणीही अशा पध्दतीने अपील होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

शेतकरी, झालेले नुकसान व भरपाईची रक्कम

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २.६४ हजार शेतकऱ्यांचे १.४८ लाख हेक्टरच्या नुकसानीपोटी २०६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. जालना २ लाख शेतकऱ्यांचे १.२३ लाख हेक्टरच्या नुकसानीपोटी १९कोटी, परभणी २.३१ लाख शेतकऱ्यांचे ९५ हजार हेक्टर नुकसानीपोटी १३० कोटी, हिंगोली २.५७ लाख शेतकऱ्यांचे १.२३ हजार हेक्टर नुकसानीपोटी १६७ कोटी, नांदेड ३९२२ शेतकऱ्यांचे ३७५८ हेक्टर नुकसानीपोटी ८.८० कोटी, बीड १७ शेतकऱ्यांचे ९.९० हेक्टर नुकसानीपोटी २.१९ कोटी,लातूर ८८८ शेतकऱ्यांचे २६२ हेक्टर नुकसानीपोटी ३५.९१ लाख, धाराशिव १९१२ शेतकऱ्यांच्या १२०८ हेक्टर नुकसानीपोटी ४.२९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

हे पण वाचा- Farmer Good News : शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल, तर शेतमजुरांना 10000 रुपये मिळतील, राज्य सरकारने केली घोषणा

Leave a Comment