नवीन सोयाबीनलाही हमी भावापेक्षा कमी दर,पहा आजचे नवीन सोयाबीन दर New soyabean rate today

नवीन सोयाबीनलाही हमी भावापेक्षा कमी दर,पहा आजचे नवीन सोयाबीन दर New soyabean rate today

New soyabean rate today परभणी व हिंगोली जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये यंदाच्या खरीप हंगामातील नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. सोयाबीनच्या आधारभूत किमतीपेक्षा (प्रतिक्विंटल ४६०० रुपये) ५०० ते ७०० रुपये कमी दराने सोयाबीन खरेदी केली जात आहे. किमान दर ३९०० रुपयांपर्यंत आहेत.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १२) सोयाबीनची ३९९ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४१०० ते कमाल ४४११ रुपये तर सरासरी ४२५५ रुपये दर मिळाले.

New soyabean rate today बुधवारी (ता. ११) सोयाबीनची ४५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४१९९ ते कमाल ४५२५ रुपये तर सरासरी ४२६२ रुपये दर मिळाले.

यंदा नव्या कापसाला मिळणार आहे 10 हजार रुपये बाजार भाव ! New Cotton price akot

New Cotton price akot

मंगळवारी (ता. १०) सोयाबीनची ६०० क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटल किमान ४२०० ते कमाल ४५६५ रुपये तर सरासरी ४३८२ रुपये दर मिळाले. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. १०) सोयाबीनची २५८ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४४५० ते कमाल ४७०० रुपये तर सरासरी ४६०० रुपये दर मिळाले.

सोमवारी (ता. ९) सोयाबीनची २७० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४३५० ते कमाल ४७०० रुपये तर सरासरी ४६५० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. १०) मानवत बाजार समितीत सोयाबीनची १९१ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विटंल किमान ३९०० ते कमाल ४५०० रुपये तर सरासरी ४४०० रुपये दर मिळाले.New soyabean rate today

परभणी व हिंगोली जिल्ह्यांत यंदा सोयाबीनचा ५ लाख ४८ हजार हेक्टरवर पेरा आहे. ऑगस्टमधील पावसाचा खंड व त्यानंतर रोगांचा प्रादुर्भाव तसेच अपरिपक्वतेच्या अवस्थेत पीक वाळून गेल्यामुळे उत्पादकेत मोठी घट येत आहे. New soyabean rate today

पुढे पहा…

Leave a Comment