ज्या त्या महिन्यातच घ्या रेशन,…अन्यथा लाभार्थ्यांना ‘ते’ धान्य मिळणार नाही ! new ration card news

ज्या त्या महिन्यातच घ्या रेशन,…अन्यथा लाभार्थ्यांना ‘ते’ धान्य मिळणार नाही ! new ration card news

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

new ration card news शासनाकडून दर महिन्याला अंत्योदय आणि प्राधान्य गटातील रेशनकार्डधारकांना मिळणाऱ्या स्वस्त धान्य दुकानातून धान्य ज्या त्या महिन्यातच न्यावे लागणार आहे. धान्य घेऊन गेले नाही तर दुसऱ्या महिन्यात ते मिळणार नाही. यामुळे लाभार्थ्यांनी वेळेत धान्य घेऊन जावे, असे आवाहन जिल्हा, तालुका पुरवठा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये बँक खात्यात जमा; आपल्या गावाची यादी मोबाईलवर पहा

जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांना प्रती कार्ड २० किलो तांदूळ आणि १५ किलो गहू, तर प्राधान्य गटातील रेशनकार्डधारकांना प्रतिसदस्य ३ किलो तांदूळ, दोन किलो गहू दर महिन्याला दिला जातो.

new ration card news अंत्योदय बाहेरगावी गेल्याने किंवा इतर काही कारणांमुळे काही लाभार्थ्यांना त्या-त्या महिन्यात धान्य घेऊन जाणे शक्य होत नसे. त्यावेळी दोन्ही महिन्यांचे धान्य एकाच वेळी घेऊन जात; पण आता शासनाच्या नव्या नियमानुसार त्या-त्या महिन्यातच धान्य घेऊन जावे लागणार आहे.

pik vima 2023

साडेपाच लाख रेशन कार्डधारकांना येते धान्य

  • जिल्ह्यात एकूण ९ लाख १४ हजार रेशनकार्डधारक आहेत.
  • त्यांपैकी साडेपाच लाख रेशनकार्डधारकांसाठी शासनाकडून दर महिन्याला धान्य येते

अन्यथा लाभार्थ्यांना ‘ते’ धान्य मिळणार नाही

दर महिन्याला मिळणाऱ्या रेशनकार्डावरील धान्य त्या त्या महिन्यातच ) घेऊन जाणे बंधनकारक आहे. घेऊन न गेल्यास दुसऱ्या महिन्यात धान्य देण्यात येणार नाही. काही कारणांमुळे धान्य वेळेत घेऊन जाणे शक्य झाले नाही तर त्यावर लाभार्थ्यांना पाणी सोडावे लागणार आहे.

शिल्लक धान्याचा प्रश्नही निकाली

आधीच्या महिन्यातील धान्य दुसऱ्या महिन्यात घेऊन जाण्याची मुभाच बंद झाल्याने शिल्लक धान्याचा प्रश्नही निकाली निघाला आहे. त्या- त्या महिन्यात आलेले धान्य त्या, त्यावेळीच वितरित केले जात आहे.

‘ही’ सवलत झाली बंद

एखाद्या महिन्यात धान्य वेळेवर म्हणजे त्याच महिन्यात घेऊन जाणे शक्य झाले नाही तर दुसया महिन्याच्या ७ तारखेपर्यंत धान्य घेऊन जाण्याची मुभा होती. मात्र आता ही मुभा रद्द करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी पुढे पहा…

Leave a Comment