mini tractor anudan yojana maharashtra : मिनी ट्रॅक्टरसाठी तीन लाखांचे अनुदान; या गटांना मिळणार लाभ

mini tractor anudan yojana maharashtra : मिनी ट्रॅक्टरसाठी तीन लाखांचे अनुदान; या गटांना मिळणार लाभ लॉटरी पद्धतीने निवड : ट्रॅक्टर व उपसाधनांवर ९० टक्के अनुदान

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

mini tractor anudan yojana maharashtra शासनाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ९० टक्के अनुदानावर देण्याची योजनाही कार्यान्वित केली आहे. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत बचत गटांना ट्रॅक्टर वितरित केले जातात.

अग्रीम पिक विमा 2023 मंजूर, विमा कंपन्यांना 628 कोटी रुपयांचा हप्ता मंजूर

पूर्वी समाजकल्याण विभागाकडून लाभार्थ्यांनाच मिनी ट्रॅक्टर वितरीत केले जात होते. त्यानंतर बचत गटांना मिनी ट्रॅक्टर वितरीत केले जात आहेत. दरवर्षी बचत गटांकडून अर्जही मागविले जात असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनच्या १ सभागृहामध्ये मिनी ट्रॅक्टर व उपसाधने योजनेंतर्गत लाभार्थ्याच्या निवडीचे आयोजन केले जाते. यावर्षीही पुढील महिन्यापासून अर्ज मागविले जाणार आहेत.

मिनी ट्रॅक्टर, उपसाधनांसाठी ९० टक्के अनुदान

solar panel yojna

अनुसूचित जाती व नवबौध घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टरसह कल्टिवेटर किवा रोटावेटर, ट्रॉली व ट्रेलर आदी साहित्य दिले जाते. ट्रॅक्टर व साहित्य खरेदीसाठी सुमारे ३.१५ लाखाचे अनुदान दिले जाते. जिल्ह्यातील अनेक बचत गटांनी य योजनेचा लाभ घेतला आहे.

योजनेसाठी काय कागदपत्रे आवश्यक

mini tractor anudan yojana maharashtra या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत बचत गट असणे अनिवार्य आहे. बचत गटात किमान दहा सदस्य असावेत. यातील ८० टक्के सदस्य हे अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील असावेत. त्यांचे राष्ट्रीयकृत २ बँकेत बचत खाते, आधारकार्ड, रेशनकार्ड आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

काय आहे योजना?

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नोंदणीकृत बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधने ९० टक्के अनुदानावर वाटपाची ही योजना आहे. यामध्ये बदल करून कोणताही ट्रॅक्टर घेतल्यास तीन लाख १५ हजार रुपये मर्यादिपर्यंत अनुदान देण्यात येत आहे.

mini tractor anudan yojana maharashtra अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर देण्याची शासनाची योजना आहे. २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाकरिता अद्याप अर्ज मागविण्यात आलेले नाहीत. पुढील महिन्यापासून अर्ज सुरु केले जाणार आहे.
बी. जी. अरवत, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त, धाराशिव

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढे वाचा…

Leave a Comment