Manoj Jarange Patil : जरांगे पाटील यांच्या भाषणात मांडलेल्या प्रमुख मागण्या आणि समस्या

Manoj Jarange Patil : जरांगे पाटील यांच्या भाषणात मांडलेल्या प्रमुख मागण्या आणि समस्या

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

Manoj Jarange Patil नमस्कार मराठी बांधवांनो काल झालेल्या अंतरवाली सराटीत मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी महासंवाद मेळावा घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करत त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

यावेळी ते बोलत असताना म्हणाले की, “मराठा समाज एक होत नाही असं बोलणाऱ्यांना या गर्दीने उत्तर दिलं आहे. कोण म्हणतो मराठा एक होत नाही. यांना ते समाजावून सांगा आरक्षण घ्यायला आला की कशाला आला आहात. Manoj Jarange Patil

पुढे बोलत असताना ते म्हणाले की,”आपल्या मराठा समाज्याची मूळ मागणी आरक्षण आहे. नेमकं कोण आहे जे मराठ्यांच्या लेकरांच्या भविष्याच्यामध्ये येत आहे? Manoj Jarange Patil

पीक विमा भरलेल्या शेतकऱ्याला मिळणारा प्रति हेक्टर 18,900 रुपये यादी बघा

Crop Insurance New list

नेमक कोण आरक्षण देत नाही हे ऐकण्यासाठी कानाकोपऱ्यातून लोक आले आहेत. सरकारला विनंती आहे की, तुमच्या हातात ४० दिवसांपैकी १० दिवस हातात उरलेले आहेत. आज जो जनसागर उसळला आहे त्यांची ही मागणी आहे की, राहिलेल्या १० दिवसांत मराठा समाजाला आरक्षण द्यावे.

उपस्थितांना संबोधताना जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्या सांगितल्या त्या पुढीलप्रमाणे..

  • महाराष्ट्रातील समस्त मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे.
  • मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा.
  • मराठा समाजासाठी बलिदान देणाऱ्या ४५ बांधवांना सांगितलेला निधी व सरकारी नोकरी द्यावी.
  • दर १० वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवाचा सर्व्हे करावा आणि प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्यात.
  • सारथी संस्थेमार्फत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देवून त्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावावेत.
  • मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करुन आरक्षण दिलं तरीही चालेल पण टिकणारं आरक्षण हवं आहे.
  • कोपर्डीच्या ताईवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी.

जरांगे पाटलांच्या भाषणातले प्रमुख मुद्दे

● 22 ऑक्टोबरला मराठ्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरणार
● मराठा समाजाला 50 टक्क्याच्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करुन आरक्षण दिलं तरी चालेल.
● 40 दिवसांपैकी 30 दिवस झालेत, 10 दिवस शिल्लक; जरांगेंकडून सरकारला मुदतीची आठवण
● 10 दिवस झाल्यानंतर 4 दिवसांपेक्षा जास्त वाट बघण्याची आमची तयारी नाही
● मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय गांभिर्याने घेऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समाविष्ट करुन कुबणी प्रमाणपत्र द्या.
● पंतप्रधान साहेबांनी फडणवीसांना समज द्यावी, कार्यकर्ते ते अंगावर घालू लागलेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment