Maharashtra Rain : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात . जोरदार पावसाची शक्यता

Maharashtra Rain : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात . जोरदार पावसाची शक्यता

Maharashtra Rain : अनुकूल हवामानामुळे राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, परिणामी गुरुवारी सकाळपासूनच राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली. आज (ता. 8) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अतिवृष्टीचा ‘यलो अलर्ट’ आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे, तर राज्याच्या उर्वरित भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

👉👉हवामान ग्रुप जॉईन करण्यसाठी येथे क्लिक करा.👈👈

Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र ओसरल्यानंतर आता ओडिशा आणि छत्तीसगडवर समुद्रसपाटीपासून ७.६ किमी उंचीवर चक्रीवादळ वारे वाहत आहेत. ही यंत्रणा मध्य प्रदेशकडे सरकणे अपेक्षित आहे. मान्सूनचे कमी दाबाचे क्षेत्र दक्षिणेकडे सरकले आहे आणि सध्या जैसलमेर, उदयपूर, इंदूर, बैतुल, गोंदिया, रायपूर, गोपाळपूरपासून पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. महाराष्ट्राच्या मध्यवर्ती भागात पूर्व-पश्चिम वाऱ्यांचा जंक्शन झोन तयार झाला आहे.

Maharashtra Rain : अनुकूल हवामानामुळे मान्सूनचा पाऊस गुरुवारी (ता. 7) पुन्हा सक्रीय झाला असून, त्यामुळे ढगाळ वातावरण आणि उष्णता कमी झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज (ता. 8) अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

👉👉आज सोयाबीन बाजारात सुधारणा झाली,पहा सविस्तर बाजार भाव👈👈

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर.

विजांसह पावसाचा इशारा : जालना, बीड, परभणी, बुलडाणा, वाशीम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

Leave a Comment