kapus pate gal : कापूस पिकातील पाते गळ थांबविण्यासाठी हा उपाय करा.

kapus pate gal : कापूस पिकातील पाते गळ थांबविण्यासाठी हा उपाय करा.

शेतकरी मंडळी कापूस पिकामध्ये पातेगळ ही समस्या सध्या जाणून येत आहे पातेगळ होण्याचे मुख्य कारण म्हणजे कापूस या पिकामध्ये पूर्णपणे अन्नद्रव्य न पोहोचणे किंवा पात्यांना पूर्णपणे अन्नद्रव्य न मिळणे हे एक मुख्य कारण होऊ शकते की जेणेकरून पातेगळ संख्या जास्त वाढते दुसरे कारण बघितले तर कापूस पिकांमध्ये पाण्याची कमतरता तसेच जास्त तापमान असल्यामुळे पातेगळ हे समस्या जाणून येते.

kapus pate gal : पातेगळ झाले तर कापूस पिकात मोठे गट होते शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते त्यासाठी आपण पातेगळ वरती कोणता उपाय केला जाईल त्यासाठी तुम्हाला कोणती फवारणी करावी लागेल हे आपण खालील प्रमाणे सविस्तर जाणून घेऊया.

Ration Card Update

kapus pate gal : कापूस पिकाचे पाते गळ व बोंड गळ या दोन्हींमुळे खूप मोठे नुकसान होते. त्यामुळे या नैसर्गिक विकृतींचे व्यवस्थापन करणे आवश्यक असते.

  • विपरीत हवामान : जास्त किंवा कमी झालेला पाऊस किंवा तापमानामध्ये झालेला चढ-उतार यामुळे पाते व बोंड गळ होऊ शकते.
  • वाढीच्या अवस्थेत अन्नद्रव्यांसाठी होणारी पिकाची स्पर्धा.
  • किडींचा प्रादुर्भाव.
  • शेतात पाणी साचून राहणे किंवा जमिनीतील ओलावा कमी हो.
  • सूर्यप्रकाशासाठी होणारी पिकाची स्पर्धा.. पाते-बोंड गळ रोखण्यासाठी उपाय
  • आपत्कालीन परिस्थितीत योग्य अन्नद्रव्ये व पाणी व्यवस्थापन करणे.
  • जास्त पाऊस झाल्यास शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेणे.
  • एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे.
  • नॅप्थील अॅसेटिक अॅसिड (एन. ए.ए.) २० पी.पी.एम. (२ मि.लि. प्रति १० लिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करणे. (ॲग्रेस्को शिफारस) वाढ नियंत्रण व शेंडा खुडणी करणे.
  • डी.ए.पी. (२ टक्के) म्हणजेच २० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे

फवारणी करणे. पिकात हवा व सूर्यप्रकाश मुबलक राहील असे व्यवस्थापन करणे.

Leave a Comment