IMD News कोकण,मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा, आजचा हवामान अंदाज पहा

IMD News कोकण,मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा, आजचा हवामान अंदाज पहा

सध्या महाराष्ट्र मध्ये सर्वेकडे ढकल वातावरण असून रिमझिम पाऊसाने सुरुवात केली आहे. मात्र शेतकऱ्यांना जोरदार पाऊसाचे अपेक्षित आहे पण अनेक भागांमध्ये अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस सकाळपासून चालू झालेला आहे, सोयरी शेतीतले कामे ठप्प झालेली आहेत. सध्या सर्वेकडे कापूस पिकांवर फवारणी चालू असा उपाय्य आहे, पण रिमझिम पाऊसामुळे फवारणी करणे शक्य नाही.

IMD News गालच्या आखातातून कमी दाबाचे क्षेत्र मध्य भारताकडे सरकत असल्याने, राज्यात पावसाच्या वाढीसाठी अनुकूल हवामानाचा अनुभव येत आहे. आज (दि. 16) उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासाठी अतिवृष्टीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. हवामान खात्याने राज्याच्या उर्वरित भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा (पिवळा इशारा) जारी केला आहे.

👉👉सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी इथे क्लिक करा.👈👈

IMD News कमी दाबाचा मान्सून अक्ष बिकानेर, कोटा, रायसेन, कमी दाब क्षेत्राचे केंद्र, संबलपूर आणि दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. नैऋत्य राजस्थान ते उत्तर ओडिशा पर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे आणि पूर्व-मध्य प्रदेश ते मध्य महाराष्ट्र ते दक्षिण कोकण पर्यंत कमी दाबाचा पट्टा आहे. समुद्रसपाटीपासून ५.८ किमी उंचीवर, उत्तर अंदमान समुद्रात चक्री वारे वाहत आहेत.

राज्यात ढगाळ हवामान झाले असून, अनेक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १६) उत्तर कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, विदर्भातील अकोला, वाशीम जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट), तर उर्वरित कोकण, नगर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, विदर्भातील बुलडाणा, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : पालघर, ठाणे, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, अकोला, वाशीम. ,

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ. विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) : सांगली, सोलापूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.

IMD News कमी दाब क्षेत्र गुजरातकडे सरकतेय बंगालच्या उपसागरात तयार झालेले ठळक कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आले असून, पूर्व मध्य प्रदेश आणि परिसरावर सक्रिय आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. पश्चिमेकडे सरकत असलेली ही प्रणाली पुढील तीन ते चार दिवसांत मध्य प्रदेशातून गुजरातकडे जाण्याचे संकेत आहेत.

Leave a Comment