IMD News गणरायाच्या आगमनासह कोसळणार पावसाच्या सरी, पहा लाईव्ह हवामान अंदाज IMD News

IMD News गणरायाच्या आगमनासह कोसळणार पावसाच्या सरी, पहा लाईव्ह हवामान अंदाज IMD News

IMD News Today In Maharashtra राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाची शक्यता असून मंगळवारी गणरायाचे आगमनदेखील पावसातच होणार आहे.

👉👉पंजाबराव हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈

IMD News Today In Maharashtra विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाची शक्यता आहे. शिवाय मंगळवारी गणरायाचे आगमनही पावसातच होणार आहे. सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस पडत असून श्रींच्या प्रतिष्ठापनेसाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, गणरायाच्या आगमनाच्या दिवशी पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मंगळवारी पुणे शहर, मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात प्रामुख्याने पाऊस पडेल.

Loan Waiver Scheme

जवळपास सर्वच भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज पुणे हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असला तरी तो जोरदार होणार नाही. त्याऐवजी हलक्या सरी पडतील. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आता कमी झाली आहे. सध्या दक्षिणपूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात मुसळधार पाऊस अपेक्षित नाही.

IMD News Today In Maharashtra मात्र, रविवारी राज्याच्या काही भागात पाऊस झाला. आता सोमवारी नाशिक आणि नंदुरबारमध्ये पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे, तर धुळे, रायगड, पालघर आणि पुणे जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील सरकारी योजना तसेच हवामान खात्याचा अंदाज किंवा शेती बाजारभाव याची माहिती पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा येथे मोफत माहिती मिळेल, येथे क्लिक करा

Leave a Comment