Hawaman Andaj : मराठवाड्यात पावसाचा अंदाज,या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार ?

Hawaman Andaj : मराठवाड्यात पावसाचा अंदाज,या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार ?

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

Hawaman Andaj : बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणालीमुळे राज्यात मॉन्सून पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. आज (ता. ६) विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज असून, उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Hawaman Andaj : मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्चिम टोक हिमालयाच्या पायथ्याकडे कायम आहे. तर पूर्व टोक सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे आले आहे. मॉन्सूनचा आस नजीबाबाद, लखनऊ, सतना, रायपूर ते कमी दाबाच्या केंद्रापर्यंत सक्रिय आहे. ही प्रणाली पोषक ठरल्याने विदर्भासह राज्याच्या विविध भागांत पावसाला पोषक हवामान होत आहे.

👉👉हवामान अंदाज ग्रुप जॉईन करा.👈👈

मंगळवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी, तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका, उकाडा कायम आहे. आज (ता. ६) पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.

Hawaman Andaj : तर मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली आणि विदर्भातील अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित विदर्भासह मराठवाड्यात विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

  • जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : वर्धा, नागपूर,भंडारा, गडचिरोली.
  • जोरदार पावसाचा इशारा : जालना, परभणी, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया.
  • विजांसह पावसाचा इशारा : सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम.

कमी दाब क्षेत्राची निर्मिती दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र

प्रदेशच्या किनाऱ्यालगतच्या ईशान्य आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ही प्रणाली ओडिशा आणि छत्तीसगडकडे सरकण्याचे संकेत आहेत. या कमी दाब क्षेत्रापासून आग्नेय उत्तर प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

Leave a Comment