फळपिकांसाठी ७८६ कोटी रुपयांची विमा भरपाई,एक लाख ६५ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ new Fruit Crop Insurance

फळपिकांसाठी ७८६ कोटी रुपयांची विमा भरपाई,एक लाख ६५ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ new Fruit Crop Insurance

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

Fruit Crop Insurance पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत आंबिया बहरातील दीड लाखाहून अधिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईस पात्र ठरविण्यात आले आहे. भरपाईची अंदाजे ७८६ कोटींची रक्कम याच महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे प्रयत्न विमा कंपन्यांकडून चालू आहेत.

सोमवार पासून बँक खात्यात |आताच आपले नाव चेक करा,

Pik Vima Kharif

शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाईची रक्कम अदा करण्यासाठी राज्य शासनाने राज्य हिस्सा म्हणून १९६ कोटींचा निधी देण्यास मान्यता दिली आहे.आंबिया बहर २०२२-२३ मधील फळपीक विमा योजनेत २ लाख १९ हजार १५५ शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरला होता. Fruit Crop Insurance

काही बोगस प्रस्ताव रद्द

मृग व आंबिया अशा दोन बहारांसाठी फळपीक विमा योजना लागू केली जाते. त्यामुळे अवेळी पाऊस, जादा तापमान, अतिपाऊस किंवा गारपिटीपासून फळपिकांना विमा संरक्षण मिळण्याची सुविधा आहे. आंबिया बहरातील विमा योजनेत डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्रॉबेरी उत्पादक सहभागी झाले आहेत. अंदाजे अडीच लाख फळबागाईतदारांनी योजनेत अर्ज भरले होते. परंतु काही बोगस प्रस्ताव रद्द करण्यात आले.

विमा कंपन्यांनी या योजनेत ८७७ कोटी एकूण रुपये विमा हप्ता गोळा केले. त्यातून आता १ लाख ६५ हजार ५७३ शेतकऱ्यांना ७८६ कोटींची विमा भरपाई दिली जाणार आहे. Fruit Crop Insurance

पात्र शेतकऱ्यांना भारतीय कृषी विमा कंपनी (एआयसी), एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी व रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडून विमा भरपाई दिली जाणार आहे. त्यासाठी या तीन कंपन्यांना विमा हप्ता रक्कम आधी द्यावी लागते. त्यानुसार ३०६ कोटी रुपयांच्या आसपास विमा हप्ता मंजूर केला होता.

त्यातून एआयसीला १५१ कोटी रुपये, एचडीएफसी अर्गो ६० कोटी; तर रिलायन्स कंपनीला ९६ कोटी रुपयांच्या आसपास विमा हप्ता मिळेल. राज्य शासनाने या कंपन्यांना १०९ कोटी रुपये यापूर्वीच दिले आहे. आता पुन्हा १९७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे चालू महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना फळपिक विम्याची भरपाई मिळण्यास अडचण येणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment