Falbag Lagwad Yojana 2023 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2023-2024,या शेतकऱ्याना लाभ मिळेल

Falbag Lagwad Yojana 2023 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2023-2024,या शेतकऱ्याना लाभ मिळेल.

नमस्कार शेतकरी मंडळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत केवळ “जॉब कार्ड धारण करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि अनुसूचित जाती-जमातीचे शेतकरी फळबाग लागवडीकरिता २ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदानास पात्र आहेत. सबब,

Falbag Lagwad Yojana 2023 राज्यामध्ये ८० % अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी असूनही त्यांच्याकडे जॉब कार्ड नसल्याकारणाने ते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीकरिता अनुदान मिळण्यास अपात्र ठरत होते. या पार्श्वभूमीवर, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरु शकत नाहीत.

Agriculture Crop Insurance

Falbag Lagwad Yojana 2023 अशा शेतकन्यांसाठी राज्यात सन २०१८-१९ च्या खरीप हंगामापासून “भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यास दि. ०६.०७.२०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ठिबक सिंचन संचाच्या उभारणीकरिताचे अनुदान केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय योजना प्रति थेंब-अधिक पिक या योजनेतून अदा करण्यात येते. तसेच शेतकऱ्यांना इतर योजनांमधुन ठिबक सिंचन संचाचा लाभ होत असल्याने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून “ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे या बाबी ऐवजी ‘खते देणे’ ही बाब समाविष्ट करण्याची तसेच सुधारित केलेल्या मापदंडांना मंजूरी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास अनुलक्षून शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये सन २०२३-२४ पासून खालीलप्रमाणे बदल करण्यास शासन मान्यता देत आहे.

फळबाग यादी pdf downlods करा

१) सन २०२३ २४ पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत ‘ठिबक सिंचनाद्वारे पाणी ‘देणे’ या बाबी ऐवजी ‘रासायनिक व सेंद्रीय खते देणे ही बाब समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२) तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत शासन अनुदानीत बाबींच्या प्रती हेक्टरी सुधारित मापदंडांना मंजूरी देण्यात येत आहे. (परिशिष्ट-अ)

३) यापुढे जिवंत झाडांचे प्रमाण निश्चित केल्यानुसार प्रमाणात दिसुन आल्यास लाभार्थीना देय असणारे अनुदान तीन वर्षांत ५०:३०:२० या प्रमाणात न देता अंदाजपत्रकामध्ये (परिशिष्ट-अ) प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षामध्ये देय दर्शविण्यात आलेल्या अनुदानाप्रमाणे देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

४) उपरोक्त प्रमाणे योजनेंतर्गत केलेले बदल व सुधारित मापंदड सन २०२३ २४ पासून लागू राहतील. त्याप्रमाणे आयुक्त (कृषि) यांनी क्षेत्रीय यंत्रणेस योजनेच्या अंमलबजावणीकरिता सविस्तर सूचना निर्गमित कराव्यात. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध

करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०९२११६१७४२१९०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

1 thought on “Falbag Lagwad Yojana 2023 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2023-2024,या शेतकऱ्याना लाभ मिळेल”

Leave a Comment