E-pik Pahani : एका मोबाईलवर १०० शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी करता येते, पुढे सविस्तर पहा

E-pik Pahani : एका मोबाईलवर १०० शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी करता येते, पुढे सविस्तर पहा

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

E-pik Pahani राज्यात चालू खरिपात ५७ लाख शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणी केली आहे. या पाहणीत सर्वाधिक सहभाग सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा असून सोयाबीनची ई-पीकपाहणीतील नोंदणी २९ लाख हेक्टरच्या पुढे गेली आहे.

👉👉आपल्या गावाची ई-पीक पाहणी यादी डाऊनलोड करा, येथे क्लिक करा👈👈

महसूल विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्यात ई-पीकपाहणी १५ ऑक्टोबरपर्यंत चालू राहील. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्या तरी त्या दूर केल्या जात आहेत. त्यामुळे तांत्रिक अडचण आल्यास शेतकऱ्यांनी गोंधळल्या स्थितीत ई-पीकपाहणी टाळू नये. अनेकवेळा सर्व्हरमधील तांत्रिक बिघाड ई-पीकपाहणीत अडथळा आणतात. परंतु, तांत्रिक बिघाड दूर होतात. त्यानंतर ई-पीकपाहणी पुन्हा करता येते. आतापर्यंत ५७ लाख सहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. राज्यात २०० पेक्षा जास्त पिकांची ई-पीकपाहणी करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. अर्थात, पहिल्या दोन सर्वाधिक मोठ्या पिकांमध्ये सोयाबीन व कपाशीचा समावेश होतो.

एका मोबाईल क्रमांकावरून १०० जणांची नोंदणी

दरम्यान, स्वतःच्या भ्रमणध्वनीवरुन ई-पीकपाहणी होत नसल्यास या प्रक्रियेपासून आपण वंचित राहू, अशी भीती बाळगू नये, असे महसूल विभागाचे म्हणणे आहे. कोणत्याही मोबाईल क्रमांकावरून १०० जणांची पीकपाहणी करता येते. त्यामुळे वैयक्तिक भ्रमणध्वनीला तांत्रिक समस्या असल्यास किंवा ई-पीकपाहणी कशी करावी हे लक्षात येत नसल्यास अशा शेतकऱ्याने खावातील कोणत्याही परिचित व्यक्तिची मदत घ्यावी. त्याच्या भ्रमणध्वनीच्या मदतीने ई-पीकपाहणी पूर्ण करता येते, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी 86 लाख पात्र

E-pik Pahani १५ सप्टेंबरपर्यंत राज्यात सोयाबीनची २९.१४ लाख हेक्टरवर तर कपाशीची १५.६७ लाख हेक्टरवर ई-पीकपाहणी झालेली आहे. त्याखालोखाल भात ७.७६ लाख हेक्टर, तूर ३.३६ लाख हेक्टर तर मक्याची नोंदणी ३.१८ लाख हेक्टरपर्यंत झाली आहे. ई-पीकपाहणीसाठी व्हर्जन दोन हे अद्ययावत उपयोजन (अॅप्लिकेशन) यंदा खुले केले गेले आहे. विशेष म्हणजे गेल्या हंगामात याच कालावधीच्या तुलनेत यंदा ई-पीकपाहणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण १० ते १५ टक्के जास्त आहे, असा दावा सरकारी यंत्रणेने केला आहे.

सव्वा कोटी हेक्टरच्या पुढे ई-पीक पाहणीची शक्यता

पंतप्रधान पीकविमा योजनेत अर्ज दाखल करताना ई-पीकपाहणी सक्तीची करण्यात आलेली नाही. मात्र नुकसान भरपाईचा दावा निकाली काढताना समजा विमा कंपनीला पिकाच्या क्षेत्राबाबत शंका आली आणि त्यातून वाद उद्भवल्यास ई-पीकपाहणीचा आधार घ्यावा, असे शासनाने ठरविले आहे. त्यामुळे यंदा शंभर टक्के ई-पीकपाहणी करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. सध्याचा वेग विचारात घेता अंतिम मुदतीपर्यंत राज्यभर अंदाजे सव्वा ते दीड कोटी हेक्टरपर्यंत ई-पीकपाहणी होण्याची शक्यता आहे, असे महसूल विभागातून सांगण्यात आले.

महाराष्ट्रातील प्रत्येक अनुदानाबद्दल माहिती किंवा शेती तंत्रज्ञान बद्दल माहिती तुम्हाला व्हाट्सअप ग्रुप मध्ये सविस्तर बघायला मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

 • Pikvima yadi 2023 शेतकर्यांच्या खात्यात पिक विमा 45000 बँक खात्यात जमा,येथे पहा यादी

  Pikvima yadi 2023 शेतकर्यांच्या खात्यात पिक विमा 45000 बँक खात्यात जमा,येथे पहा यादी

  Pikvima yadi 2023 शेतकर्यांच्या खात्यात पिक विमा 45000 बँक खात्यात जमा,येथे पहा यादी WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now Telegram Group Join Now 24 जिल्ह्यांतील एकूण 52 लाख शेतकऱ्यांना रु.चा आगाऊ पीक विमा मिळाला आहे. 2216 कोटी, जे खरीप हंगामात पाऊस न पडण्यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीपैकी 25 टक्के आहे. यापैकी रु. 1690 कोटी रुपये…


 • महाराष्ट्रातील कापसाला मिळाला ७ हजार ४०० रुपये भाव, पहा आजचे ताजे भाव… Cotton rate today Mh

  महाराष्ट्रातील कापसाला मिळाला ७ हजार ४०० रुपये भाव, पहा आजचे ताजे भाव… Cotton rate today Mh

  महाराष्ट्रातील कापसाला मिळाला ७ हजार ४०० रुपये भाव, पहा आजचे ताजे भाव… Cotton rate today Mh WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now Telegram Group Join Now अमरावती Cotton rate today Mhशेतमाल: कापूसआवक (क्विंटल) : 55कमीत कमी दर: 6500जास्तीत जास्त दर: 7175सर्वसाधारण दर: 6837 PM Kisan Beneficiary Status : पती-पत्नी दोघांनाही मिळणार 4000 रुपये, 17 व्या…


 • New Crop Insurance : पिक विमा 36000 बँक खात्यात जमा, यादी चेक करा

  New Crop Insurance : पिक विमा 36000 बँक खात्यात जमा, यादी चेक करा

  New Crop Insurance : पिक विमा 36000 बँक खात्यात जमा, यादी चेक करा WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now Telegram Group Join Now New Crop Insurance नमस्कार मित्रांनो, १३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी पीक विमा जाहीर झाला आहे. आणि या 13 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. मित्रांनो, तेरा जिल्हे कोणते आणि किती गावे पीक विम्यासाठी पात्र…


Leave a Comment