ई-पीक पाहणी नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांना उरले फक्त 4 दिवस,आत्ताच आपली ई-पीक पाहणी करावी ! E-pik last date

ई-पीक पाहणी नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांना उरले फक्त 4 दिवस,आत्ताच आपली ई-पीक पाहणी करावी ! E-pik last date

E-pik last date महाराष्ट्र मध्ये एक रुपयात पिक विमा योजना अनेक शेतकऱ्यांनी भरलेला आहे ही पीक नोंदणीसाठी आता शेतकऱ्यांकडे कमी दिवस राहिलेले असून फक्त चार दिवस शेतकऱ्यांच्या हातात शिल्लक आहे त्यासाठी आपल्या शेत भालाची पिके आपल्या ई-पीक मोबाईल वरती भरावी.

कर्जमाफीच्या नवीन याद्या जाहीर,आपल्या गावाची यादी पहा

E-pik last date शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकाची अचूक नोंद शासन दप्तरी व्हावी आणि शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा व्हावा या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या ‘ई-पीक पाहणी’ अॅपवर पिकांची नोंदणी करण्याची २५ सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. या नोंदणीसाठी फक्त ५ दिवसांचा कालावधी राहिल्याने शेतकऱ्यांना याबाबत तातडीने नोंदणी करावी लागणार आहे.

E-pik Pahani

E-pik last date राज्य शासनाच्या वतीने महसूल व कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ई-पीक पाहणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेत शेतकऱ्यांनी स्वत:च प्रत्यक्ष शेतात जाऊन मोबाईलच्या साह्याने ई-पीक पाहणी करून त्याची संबंधित अॅपवर नोंद करायची आहे. यासाठी त्यांना महसूल व कृषि विभागाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात येत आहे.

E-pik last date या ई-पीक पाहणीमुळे शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची अचूक नोंद होणार आहे. नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी यासंदर्भातील आकडेवारी कामाला येणार आहे तसेच शासनालाही एकूण किती जमिनीवर कोणत्या पिकाचा पेरा झाला, याची माहिती उपलब्ध होणार आहे.

या ई-पीक पाहणीच्या नोंदणीसाठी गेल्या काही दिवसांपासून मोबाईल नेटवर्कचा अडथळा येत असल्याने अनेक शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागला. त्यामुळे शासनाने यावर्षी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत असलेल्या या नोंदणीसाठी २५ सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-पीक नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन महसूल व कृषि विभागाने केले आहे.

ई-पीक पाहणी नोंदविण्यासाठी २५ सप्टेंबरपर्यंतच

आळंद गावातील ९०० पैकी ६०० च्या वर शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली आहे. आता २५ सप्टेंबरपर्यंतच शेतकऱ्यांना यासाठी अॅपवर नोंदणी करण्यात येणार आहे. येत्या ५ दिवसांत १०० टक्के ई-पीक पाहणी पूर्ण होईल, अशी आशा आहे.

महाराष्ट्र मधील प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ तसेच शेती तंत्रज्ञान माहिती किंवा शेती बाजारभाव बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा, येथे क्लिक करा.

Leave a Comment