Cyclone Tej : 24 तासात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता,IMD नवीन माहिती

Cyclone Tej : 24 तासात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता,IMD नवीन माहिती

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

Cyclone Tej शुक्रवारी दुपारी अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने येत्या 24 तासांत तेज चक्रीवादळ विकसित होण्याची शक्यता आहे.

Cyclone Tej 22 ऑक्टोबरपर्यंत ते तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. हे वादळ गुजरातच्या किनारपट्टीच्या दिशेने मार्गक्रमण करेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

 5 लाखापर्यंत मिळणार मोफत उपचार ! ‘आयुष्मान भारत कार्ड’ काढावे लागणार

गेल्या तीन दिवसांपासून नैऋत्य अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राची हालचाल सुरू आहे. त्यामुळे शुक्रवारी अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले.

शनिवारी 21 तारखेला ते चक्रीवादळात विकसित होण्याची आणि रविवारी 22 रोजी मोठ्या चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. Cyclone Tej

हे चक्रीवादळ अरबी समुद्रातून उगम पावून गुजरात किनार्‍याकडे वळण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामानशास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. Cyclone Tej

परिणामी, 21 ते 23 ऑक्टोबर या कालावधीत अपेक्षीत उग्र परिस्थितीमुळे मच्छिमारांना समुद्रात जाण्यापासून सावध करण्यात आले आहे. याशिवाय, या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नाही, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

पुढे वाचा..

Leave a Comment