Crop Insurance Status| ब्रेकिंग न्यूज ! या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होण्यास सुरुवात येथे चेक करा यादी

Crop Insurance Status| ब्रेकिंग न्यूज ! या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होण्यास सुरुवात येथे चेक करा यादी

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance Status : बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आगाऊ पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे आपत्तीचा फटका बसलेल्या पन्नास लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा – Mcx price 23 decembar : आज कापसाला मिळाला चांगला दर, संपूर्ण बाजार भाव येथे पहा

राज्यातील 49 लाख 5 हजार 032 शेतकर्‍यांसाठी एकूण 2,086 कोटी 54 लाख रुपये आगाऊ पीक विमा म्हणून वाटप करण्यात आले आहेत. आता वितरण प्रक्रिया सुरू झाली आहे. Crop Insurance Status

बुलढाणा जिल्ह्यातील ३६ हजार ३५८ शेतकऱ्यांना १८ कोटी ३९ लाख रुपयांचा आगाऊ पीक विमा मंजूर करण्यात आला असून ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्यव्यापी एल्गार आंदोलन केले होते.

👉👉पिक विमा पात्र जिल्ह्याची यादी जाहीर👈👈

बुलढाण्यात एल्गार महामोर्चा आणि अन्नत्याग आंदोलनानंतर २८ नोव्हेंबरला रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मंत्रालयावर ताबा मिळवण्यासाठी जबरदस्तीने मुंबईत घुसले होते. Crop Insurance Status

रविकांत तुपकर यांनी मांडलेल्या मागण्यांसाठी २९ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. सह्यांद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत बहुतांश मागण्या मंजूर करण्यात आल्या. Crop Insurance Status

हिवाळी अधिवेशनापूर्वी आगाऊ पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची एक मागणी होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात आगाऊ पीक विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

हेही वाचा – E Pik Pahani list : ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात 15530 रुपये जमा,आपले नाव पहा

Leave a Comment