Cotton Today News : शेतकऱ्यांकडील कापूससाठा संपत आल्यावर दरात सुधारणा ? बाजारात ८४ टक्के कापूस

Cotton Today News : शेतकऱ्यांकडील कापूससाठा संपत आल्यावर दरात सुधारणा ? बाजारात ८४ टक्के कापूस

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

देशात विक्रमी कापूस उत्पादनाचे चुकीचे अंदाज व्यक्त करणाऱ्या देशातील नफेखोर कापूस खरेदीदार, व्यापाऱ्यांना पुन्हा एकदा सुगीचे दिवस येत आहेत. शेतकऱ्यांकडील कापूससाठा संपत येत असतानाच नेहमीप्रमाणे दरात सुधारणा सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान आणि व्यापारी मालामाल अशी स्थिती आहे. Cotton Today News

📢हे पण वाचा- Namo shetkari GR : नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता जीआर आला,1792 कोटी रुपयांचा निधी वितरित, पहा सविस्तर

यावर्षी शेतकऱ्यांना कापसाला सरासरी ६६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. शिवाय कापसाचे तीन ते चार वेगवेगळे दर होते. हमी भावाने कापसाची खरेदी केवळ सहा ते साडेसहा लाख कापूस गाठी (एक गाठ 170 किलो रुईच्या समतुल्य) एवढीच झाली आहे. Cotton Today News

व्यापारी शेतकऱ्यांकडील कापूस साठ्याचे सर्वेक्षण करतात.

व्यापारी आणि एजंटांनी सर्वेक्षण केले आणि प्रत्येक गावात शेतकऱ्यांकडे किती कापूस साठा आहे याचा अंदाज लावला. त्या काळात शेतकऱ्यांकडे ७० ते ७५ टक्के कापूस साठा होता, त्यामुळे कापसाच्या दरावर सतत दबाव राहिला. मात्र, शेतकऱ्यांकडे असलेला कापसाचा साठा १५ ते १६ टक्क्यांपर्यंत कमी झाल्यानंतर कापसाच्या भावात सुधारणा होऊ लागली. एवढी सुधारणा होऊनही सध्या कापसाच्या भावात झालेली वाढ आणि सुधारणा यांचा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

देशात कापसाचे उत्पादन घटले आहे. जगातही अपेक्षित कापूस नाही, असे दोन वर्षे चर्चिले जात आहे, पण दोन हंगामांपासून शेतकऱ्यांना चांगला कापूसदर मिळाला नाही. ज्या वेळेस शेतकऱ्यांकडील कापूससाठा संपतो, त्याच वेळी कापूस बाजार सुधारतो, हा अनुभव पुन्हा एकदा आला आहे. सुधारित दराचा लाभ खरेदीदार, कारखानदारांना होत आहे. शासनाने कापूस उत्पादकांचा तोटा भरून काढण्यासाठी ठोस योजना आणावी. –
किरण पाटील, शेतकरी, सनपुले (जि. जळगाव)

📢हे पण वाचा- PM Kisan Beneficiary List : 16 व्या हप्त्याचे 4000 रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा , वाचा सविस्तर माहिती

याचा अर्थ देशातील फक्त २६ ते २७ लाख क्विंटल कापसाची हमीभावात (७०२० रुपये) खरेदी झालो आहे, तर २१० लाख गाठीएवढ्या कापसाची खरेदी सरासरी ६६०० रुपये प्रतिक्विंटलने खासगी खरेदीदार, व्यापाऱ्यांनी केली आहे.Cotton Today News

कापसाच्या एका गाठीसाठी पाच क्विंटल कापूस लागतो. गुलाबी बोंडअळी आणि इतर नैसर्गिक समस्यांमुळे देशातील कापूस उत्पादन चार वर्षांपासून कमी होत आहे. मात्र, देशांतर्गत कापूस उत्पादनाचा अंदाज घेताना, देशात १२७ ते १२९ लाख हेक्टरवर कापसाची लागवड होते या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून कापसाचे भाव 6600, 6800, 7100 रुपये प्रतिक्विंटल दरम्यान चढले आहेत.

📢हे पण वाचा- Pik vima status : बँक खात्यात पीक विमा जमा यादीत नाव पहा…

व्यापाऱ्यांनी कमी दर्जाचा कापूस ५ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केला आहे. दरम्यान, हमी भाव देण्यासाठी सरकारने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. यंदा कापूस बाजारात अस्थिरता आहे. देशात 290 ते 295 लाख गाठी कापसाचे उत्पादन होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, परंतु कमी पाऊस आणि गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव यासारख्या समस्यांमुळे पिकाचे नुकसान झाले आहे. प्रत्यक्षात 295 लाख गाठींचे उत्पादन होईल की नाही याबाबतही साशंकता आहे.

मात्र, खरेदीदार आणि विविध कापूस व्यापारी संघटना सातत्याने कापसाचा साठा जास्त असल्याचे भासवत आहेत. जेव्हा शेतकऱ्यांकडून केवळ 18 ते 20 टक्के कापूस मिळतो आणि बहुतांश भाग खरेदीदार, व्यापारी आणि कारखानदारांकडे जातो तेव्हा कापसाचे भाव वाढू लागतात. Cotton Today News

📢हे पण वाचा- Namo shetkari yojana installment : नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची दुसऱ्या हप्ताची तारीख झाली जाहीर

Leave a Comment