Cotton farmer good news : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, कापसाला जगभर मागणी, दोन वर्षांचा उच्चांक, २० लाख गाठींच्या निर्यातीचा अंदाज

Cotton farmer good news : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, कापसाला जगभर मागणी, दोन वर्षांचा उच्चांक, २० लाख गाठींच्या निर्यातीचा अंदाज

फेब्रुवारीमध्ये कापसाची निर्यात दोन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली असून ती वाढतच राहण्याची अपेक्षा आहे. देशातील व्यापाऱ्यांनी आशियातील प्रमुख खरेदीदारांसोबत सुमारे 4,00,000 कापसाच्या गाठींसाठी खरेदी करार केले आहेत. देशांतर्गत कापूस उत्पादनात घट झाली असली तरी निर्यातीसाठी अनुकूल परिस्थिती उत्पादकांसाठी फायदेशीर ठरेल.

📢हे पण वाचा- Soyaben price market : आज सोयाबीनला किती मिळाला दर ? पहा सविस्तर माहिती

व्यापाऱ्यांनी फेब्रुवारीमध्ये चीन, बांगलादेश, व्हिएतनाम आदी देशांसोबत ४ लाख कापसाच्या गाठी (६८ हजार मेट्रिक टन) निर्यातीसाठी करार केले आहेत. २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारताकडून २० लाख गाठींची निर्यात केली जाईल, असा अंदाज आहे. याआधी देशातून १४ लाख गाठींची निर्यात होईल, असा अंदाज होता. काही व्यापाऱ्यांच्या मते निर्यात २५ लाख गाठींहून अधिक होऊ शकते. Cotton farmer good news

उत्पादन ७.७ टक्के कमी Cotton farmer good news

  • जगभरातील बाजारांमध्ये कापसाची वाढलेली मागणी आणि वाढलेली निर्यातक्षमता याचा लाभ देशाला मिळताना दिसत आहे; परंतु दुसरीकडे कापसाचे स्थानिक उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झालल्याने निर्यातीवर दबाव येऊ शकतो.
  • कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या
    अंदाजानुसार, २०२३-२४ या वर्षात भारतातील कापसाचे उत्पादन ७.७ टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे. २००७-०८ नंतर कापूस उत्पादनाचा हा नीच्चांक आहे.

पेपर बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रमुख निर्यातदारांच्या तुलनेत भारतीय कापूस स्वस्त आहे. प्रमुख निर्यातदारांमध्ये अमेरिका आणि ब्राझील या देशांचा समावेश आहे. या दोन्ही देशांशी भारताचे सलोख्याचे संबंध आहेत. वामुळे कापूस निर्यातीला अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. Cotton farmer good news

📢हे पण वाचा- Pik vima status : बँक खात्यात पीक विमा जमा यादीत नाव पहा…

Leave a Comment