Cotton Crop Vima : कापसाची ७२ कोटींची भरपाई विमा कंपनीने ठेवली अडवून,संपूर्ण माहिती पुढे पहा

Cotton Crop Vima : कापसाची ७२ कोटींची भरपाई विमा कंपनीने ठेवली अडवून,संपूर्ण माहिती पुढे पहा

Cotton Crop Vima : ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील २७ महसूल मंडळांमध्ये २१ व त्यापेक्षा अधिक दिवस पावसाने पाठ फिरविल्यामुळे कापसाचे ५० ते ७० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटले होते. ज्या शेतकऱ्यांनी पीकविम्याची रक्कम भरली होती. अशा शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम देण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. मात्र, अजूनही विमा कंपनीकडून ही रक्कम कापूस उत्पादकांना दिलेली नाही.

Mcx Cotton Crop : कापूस उत्पादकांना ५०० कोटींचा फटका,कापूस भाव सुधारणा होणार

Mcx Cotton Crop

विशेष म्हणजे, ही रक्कम देण्याबाबत राज्य शासनाने विमा कंपनीचे अपील फेटाळले. मात्र, विमा कंपनीने आता राज्याने अपील फेटाळल्यानंतर केंद्र शासनाकडे अपील दाखल केले आहे. Cotton Crop Vima

  • पावसाचा सलग २१ दिवस खंड पडल्यामुळे जिल्ह्यातील २७ महसूल मंडळे खरीप पीकविम्यां- तर्गत पीकविम्याच्या नुकसानभर पाईसाठी पात्र ठरले होते. त्यात कापसासह मूग, उडीद, सोयाबी- नचेही नुकसान झाले होते. पीकविमा कंपनीकडून यासाठी ७६ कोटी ५० लाख रुपयांची नुकसानभरपाईची रक्कमदेखील जाहीर करण्यात आली.
  • त्यानंतर दिवाळीआधी विमा कंपनीने केवळ मूग, उडीद व सोयाबीन या पिकांची चार कोटी ५० लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली होती. तर कापसाची ७२ कोटींची रक्कम अद्यापही विमा कंपनीकडून देण्यात आलेली नाही. एक लाखाहून अधिक शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत.
  • मात्र, विमा कंपनीकडून ही रक्कम देण्याबाबत अनेक अडथळे निर्माण केले जात आहेत. आधीच कमी भाव मिळाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. त्यात विमा कंपनीच्या या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे. Cotton Crop Vima
  • राज्य शासनाने अपील फेटाळल्यामुळे कंपनीने केंद्र शासनाकडे अपील दाखल केले आहे. कंपनीच्यावरच्या पातळीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे याबाबत जास्त सांगता येणार नाही. Cotton Crop Vima

सादर केलेले अपील फेटाळले आहे. आता कंपनीने केंद्र शासनाकडे अपील दाखल केल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने केंद्रीय सचिव यांची भेट घेऊन, तत्काळ हे अपील फेटाळून २५ टक्के कापूस पिकाची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्याबाबतचा आदेश देण्याची विनंती व मागणी केली आहे. – उन्मेष पाटील, खासदार

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment