CCI Cotton Stop : या कारणामुळे सीसीआय करणार कापसाची खरेदी बंद, पहा पुढे सविस्तर

CCI Cotton Stop : या कारणामुळे सीसीआय करणार कापसाची खरेदी बंद, पहा पुढे सविस्तर

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) मोठा गाजावाजा करून मागील महिन्यात कापूस खरेदी सुरू केली. निश्चित सर्व केंद्र सुरू झालेच नाहीत. त्यात आता वाढता तोटा व दर्जेदार कापसाची आवक होत नसल्याचे कारण पुढे करून कापूस खरेदी बंद करण्याची तयारी सीसीआय करीत आहे. CCI Cotton Stop

📢हे पण वाचा- उद्यापासून दुचाकी चालकांना ₹35,000 चा दंड आकारण्यात येणार आहे. कृपया या नियमांचे पालन करा.Traffic Challan News

कापूस उत्पादकांसाठी ही संस्था स्थापन झाली. परंतु व्यवसायवाढ, नफा हा उद्देश घेऊन ही संस्था आता कार्यरत असून, कुठलाही तोटा सहन न करण्याची भूमिका ‘सीसीआय’च्या वरिष्ठांनी घेतली आहे. ‘सीसीआय’चे निकष जाचक असल्याने कापूस खरेदीला यंदा प्रतिसाद मिळालेला नाही. आता बाजारात हमीभावापेक्षा कमी दर असून, व्यापारी लुटालूट करीत आहेत.

अशा स्थितीत सीसीआयने खरेदी बंद केल्यास बाजारातील दर आणखी पडतील, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे. खानदेशात ‘सीसीआय’ने सुमारे ११ खरेदी केंद्र निश्चित केले होते. तेथे ग्रेडरची नियुक्ती केली. परंतु जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, पहूर (ता. जामनेर), जळगाव येथे खरेदी सुरू केली. खानदेशात किंवा राज्यात

‘सीसीआय’ने अल्प कापूस खरेदी केली. मागील आठवड्यापर्यंत ‘सीसीआय’ने राज्यात फक्त एक लाख कापूसगाठींच्या (एक गाठ १७० किलो रुई) कापसाची म्हणजेच सुमारे पाच लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. CCI Cotton Stop

बाजारात कापसाचे भाव कमी आहेत, त्यामुळे भारतीय कापूस महामंडळ (CCI) जास्त दराने किंवा हमी भावाने कापूस खरेदी करू शकत नाही. खाजगी उद्योगपती किंवा जिनिंग व्यावसायिकांना 170 किलो कापसाची एक गाठी तयार करण्यासाठी दोन हजार रुपये खर्च येतो. CCI Cotton Stop

सीसीआयला मात्र कापूस प्रक्रिया उद्योग नसल्यामुळे एका गाठीसाठी चार हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्याऐवजी ते कापूस खरेदी केंद्र आणि प्रक्रिया प्रकल्प भाड्याने घेतात. दरवर्षी तेथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागते. केंद्र सरकारचे वस्त्रोद्योग मंत्रालय या कर्मचाऱ्यांचे वेतन केंद्रीय मानकांनुसार देते, तसेच इतर खर्चही केंद्र करते. CCI Cotton Stop

📢हे पण वाचा- Cotton Rate 26 January : बाजार समिती मध्ये कापसाचे बाजार भाव वाढणार कधी ? जाणून घ्या आजचे भाव

Leave a Comment