Animal Care : लाळ्या-खुरकूत झाला असेल तर ! जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

Animal Care : लाळ्या-खुरकूत झाला असेल तर ! जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

लाळ्या खुरकुताची लक्षणं

Animal Care खुरकुताची लागण झाली की जनावर हे शांत राहते. नियमितपणे चारा खात नाही पाणी पिणे बंद करते.

📢हे पण वाचा- Beneficiary List of PM Kisan : तुमच्या बँक खात्यात 2000 आले का, तात्काळ यादीत नाव पहा

 • दुभते जनावर असेल तर दुधाचे प्रमाणही कमी Animal Care
 • जनावराच्या तोंडाच्या आतील भागाला तसेच जीभेवर फोड येतात.
 • जनावरांच्या तोंडातून लाळ गळते तर पुढच्या पायांच्या मध्यभागी फोड येतात.
 • गाभण जनावरांच्या मागच्या पायात हे फोड आले तर अपंगत्वसुध्दा येऊ शकते

प्रतिबंधात्मक उपाय

 • जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये.
 • बाधित जनावराशेजारी निरोगी जनावर बांधू नये किंवा त्याचा चाराही त्याला देऊ नये.
 • बाधित जनावराची पाण्याची स्वतंत्र सोय करावी
 • बाधित जनावरे बांधलेली जागा दिवसातून किमान एकदा जंतुनाशकाने स्वच्छ धुवा.
 • जनावरांचे दूध काढण्याची भांडी थुण्याच्या सोड्याने व गरम पाण्याने धुऊन घ्या.
  आजही ग्रामीण भागात जनावराने अधिकची लाळ गाळली तर चप्पल जीभेवर घासली जाते.
 • लाळ्या खुरकूत आजाराच्या नियंत्रणासाठी सप्टेंबर आणि मार्चमध्ये लसीकरण करावं.

Leave a Comment