14 लाख शेतकऱ्यांना एक हजार कोटींची मदत,यादीत आपले नाव चेक करा.pik vima new list

14 लाख शेतकऱ्यांना एक हजार कोटींची मदत,यादीत आपले नाव चेक करा.pik vima new list

pik vima new list नमस्कार शेतकरी मंडळी, जून आणि जुलै महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जमीन आणि पिकांच्या मदतीपोटी एक हजार कोटी ७१ लाख रुपयांच्या वितरणास राज्य सरकारने मंगळवारी (ता. ३) मान्यता दिली. राज्य सरकारने एक हजार कोटी रुपये वितरित करून दुष्काळाच्या झळा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

नांदेडला सर्वाधिक मदत मिळाली

छत्रपती संभाजीनगर विभागातील जालन्यातील २८२ शेतकऱ्यांना ३३ लाख ५९ हजार, परभणीतील २०१ शेतकऱ्यांना २७ लाख ७५ हजार, हिंगोलीतील २७ हजार ७४२ शेतकऱ्यांना १४ कोटी ५४ लाख २८ हजार, नांदेडमधील ६ लाख १७ हजार ९११ शेतकऱ्यांना ४२० कोटी ४६ लाख ६१ हजार, बीडमधील १२७ शेतकऱ्यांना ९ लाख ६४ हजार, लातूरच्या ३२ शेतकऱ्यांना २ लाख ९२ हजार अशी मदत देण्यात येणार आहे.

Silai Machine Yojana

pik vima new list राज्यात जून आणि जुलैमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागांत झालेल्या नुकसानीचे प्रस्ताव राज्य सरकारकडे दाखल झाले होते. या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील १४ लाख ९ हजार ३१८ शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड आणि लातूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ही मदत मिळेल. पीक नुकसानीसाठी अमरावती विभागातील एकूण ७ लाख ६३ जार २३ शेतकऱ्यांना ५५७ कोटी २६ लाख रुपये, तर छत्रपती संभाजीनगर विभागातील ६ लाख ४६ हजार २९५ शेतकऱ्यांना ४३५ कोटी ७४ लाख रुपयांची मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत मिळेल.

अमरावती विभागात शेतीचे जास्त नुकसान

pik vima new list अमरावती विभागातील शेतजमिनींचे सर्वाधिक तीन जार १८ हजार हेक्टरच्या नुकसानीपोटी ७८ कोटी ७५ लाख ७८ हजार रुपयांची मदत दिली जाईल. यामध्ये अमरावतीमध्ये ५१.८९ हेक्टर, अकोल्यात ४ हजार ३७७.९७, यवतमाळमध्ये १० हजार ७५७, बुलडाण्यात १२ हजार ९०२ आणि वाशिममध्ये १९२९.०९ हेक्टरचे नुकसान झाले आहे.

तर अमरावती विभागात शेतजमिनीच्या नुकसानीपोटी ७८ कोटी ७५ लाख रुपयांची मदत मिळेल. अमरावती जिल्ह्यातील ९० हजार २५५ शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीपोटी ६५ कोटी ३२१ लाख ९१ हजार, अकोल्यातील २ लाख ५७१ हजार शेतकऱ्यांना १४४ कोटी २८ लाख, ८११, यवतमाळमधील २ लाख ६३ हजार शेतकऱ्यांना १८५ कोटी १० लाख, बुलडाण्यातील १ लाख ४८ हजार ४२३ शेतकऱ्यांना ११५ कोटी, ४० लाख ९८२, वाशीममधील ६० हजार १६५ शेतकऱ्यांना ४७ लाख १४ हजार ७१८ अशी ५५७ कोटी २६ लाख ४४ हजार रुपयांची मदत मिळेल.

Leave a Comment