‘लम्पी स्कीन’ मुळे १५ दिवसांत ४२ हजार पशूधन बाधित, पहा संपूर्ण बातमी

‘लम्पी स्कीन’ मुळे १५ दिवसांत ४२ हजार पशूधन बाधित, पहा संपूर्ण बातमी

साडेनऊशे पशूंचा मृत्यू; कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ७५२ मृत्यू

महाराष्ट्र मध्ये अनेक महिन्यापासून लंबी ला आजाराने सर्वेकडे हंगाम वाचवला होता. मात्र काही दिवसांमध्ये हा लंबी स्कीन शांत झाला होता, मात्र अनेक ठिकाणी जनावरांना ‘लम्पी स्कीन’ आजार आता दिसून आलेला आहे. अनेक ठिकाणी सुरवातीत असलेल्या लंगाच्या स्थितीमुळे अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात नुकसानी झालेले आहेत.

👉👉संपूर्ण बातमी पाहण्यासाठी इथे क्लिक करा👈👈

लम्पी स्कीन आजाराचा फैलाव राज्यात वेगाने वाढत असून, गेल्या १५ दिवसांत तब्बल ४२ हजार ७८४ पशुधन बाधित झाले असून, मृतांची संख्या ९७३ ने वाढली आहेत. तर एप्रिल ते सप्टेंबर (३ सप्टेंबर अखेर) या पाच महिन्यांमध्ये तब्बल ५५ हजार ५८ पशुधन बाधित झाले असून, त्यापैकी ४ हजार ६३० पशुधन मृत झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून देण्यात आली. तर सर्वाधिक मृत पशुधनाची संख्या ही कोल्हापूर जिल्ह्यात ७५२ एवढी आहे.

राज्यात गेल्या पाच महिन्यांपासून लम्पी स्कीन आजाराचा फैलाव सुरू झाला आहे. फैलाव वेळीच रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने तातडीने लसीकरण मोहीम हाती घेतली. मात्र या लसीचा परिणाम होताना दिसत नसल्याचे समोर येत असून, लम्पीचा नवीन व्हेरियंट तयार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, त्यावर संशोधन देखील सुरू झाले आहे.

👉👉अशाच नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.👈👈

यासाठी विविध पशुसंवर्धन महाविद्यालयातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ, संशोधक यांच्याकडून बाधित आणि लसीकरण केलेल्या पशुधनाच्या रक्ताचे नमुने राष्ट्रीय विषाणूजन्य आजार संशोधन संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत.दरम्यान राज्यातील सुमारे १ कोटी ३९ लाख ९२ हजार ३०४ गोवर्गीय पशुधनापैकी १ कोटी ३७ लाख ४ हजार ९७० पशुधनाला म्हणजेच ९७ टक्के पशुधनाला लसीकरण करण्यात आले आहे.

सध्या वारसांना लसीकरणावर भर देण्यात आला असून, गाभण गाईंची संख्या लक्षात घेऊन, व्यायल्यानंतर येणाऱ्या वासरांना लसीकरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे.यासाठी लसमात्रा प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त हेमंत वसेकर यांनी सांगितले.

Leave a Comment