‘नमो शेतकरी’ योजनेच्या विशेष मोहिमेस मुदतवाढ, सर्व शेतकऱ्यांना मिळणार या योजनेचा लाभ

‘नमो शेतकरी’ योजनेच्या विशेष मोहिमेस मुदतवाढ, सर्व शेतकऱ्यांना मिळणार या योजनेचा लाभ

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now
अधिक माहितीसाठी whatsapp ग्रुप जॉईन करा.

महाराष्ट्रात सुरू करण्यात येत असलेली नमो शेतकरी महा सन्माननीती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ कसा मिळणार आहे याची माहिती आपण बघूया आणि नमो शेतकरी माणसांना निधीमध्ये खास विशेष वाढ करण्यात आलेले आहे जेणेकरून या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना कसा दिला जाईल याची माहिती आपण बघूया.

नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळावा यासाठी प्रमाणीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेस सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

E Pik Pahani last Date
E Pik Pahani last Date

मंत्रालयात नमो शेतकरी महासन्मान योजनेचा आढावा घेण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. पंतप्रधान शेतकरी सन्मान (पीएम किसान) योजनेच्या लाभापासून विविध अडचणींमुळे वंचित राहिलेल्या १२ लाख शेतकऱ्यांचा पीएम किसान व नमो महा महासन्मान योजनेत समावेश करण्यात यावा यासाठी राज्य शासनाने गाव पातळीवर कृषी, महसूल व भूमिअभिलेख विभागाच्या मार्फत एकत्रित विशेष मोहीम सुरू केली होती, त्याअंतर्गत आतापर्यंत ४ लाख शेतकऱ्यांनी आपल्या त्रुटी दुरुस्त करून आवश्यक अटींची पूर्तता केली आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.

हेही वाचा:-नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता येणार 2000 हजार रुपये खात्यात,यादीत नाव चेक करा !

मात्र अजूनही आठ लाख शेतकऱ्यांची पडताळणी बाकी असल्याने विशेष मोहिमेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी प्रशासनाने केली. भूमी अभिलेख अद्ययावत करणे, ई-केवायसी करणे, आधार बँक खात्यास संलग्न करणे आदी बाबींची पूर्तता करण्यात येत आहे. पुढील सात दिवसांत ही पडताळणी पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला.

बैठकीला कृषी आयुक्त सुनील चव्हाण, कृषी संचालक दिलीप झेंडे, महाआयटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, महाआयटीचे विभाग प्रमुख किरण गारग, अमेय सरवणकर, सहसचिव सरिता बांदेकर- देशमुख, श्रेणिक शहा, उपसचिव संतोष कराड, अवर सचिव नीता शिंदे, उपआयुक्त दयानंद जाधव तसेच कृषी व माहिती तंत्रज्ञान या दोन्ही विभागाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अजून सविस्तर माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Comment